देश

…तर ‘राम नाम सत्य’ची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ

Yogi Adityanath

लखनऊ | लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.

आम्ही ऑपरेशन शक्ती राबवत आहोत. ऑपरेशन शक्तीचा हाच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही महिलांची सुरक्षा करणार आहोत, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.

सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशार देत आहे जे आपली ओळख लपवतात आणि आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणालेत.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या लव्ह जिहादच्या प्रकरणांना अत्यंत गंभीरतेने घेतल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या-

‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’

“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”

“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

फ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का?; संजय राऊतांचे सूचक विधान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या