बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे”

नवी दिल्ली | तालिबानने अफगाणिस्तानावर आक्रमण करून तेथे सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर त्या देशात आता तालिबानची राजवट चालू झाली. या घटनेवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.  अशातच तालिबानला समर्थन करणाऱ्यांनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचंड संतापले आहेत. ते उत्तर प्रदेशच्या विधानसभेत बोलत होते.

अफगाणिस्तानला आपल्या ताब्यात घेऊन तालिबाननी खरं तर आपला देश स्वातंत्र केला आहे. त्यावरूनच भारतात सद्या राजकारण सुरू झालं आहे, असं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पार्टीचे खासदार डॉ. शफीकूर रेहमान बर्क केलं होतं. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या विधानसभेत याेगी आदित्यनाथ यांनी बर्क यांच्यावर निशाणा साधला आहे.

भारतावर ज्याप्रमाणे ब्रिटिशांचे राज्य होतं त्याप्रमाणे रशिया आणि अमेरिकेचे राज्य अफगाणिस्तानवर होतं. भारतांनी ब्रिटिशांविरोधात संघर्ष करून सत्ता मिळवली आहे. त्याचप्रमाणे तालिबानने रशिया आणि अमेरिकाविरोधात संघर्ष करून देश स्वातंत्र केला, असं बर्क यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, संपुर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानच्या घटनेवर लागून आहे. अफगाणिस्तानच्या महिला आणि लहान मुलांनावर तालिबानकडून होत असलेल्या अत्याचारबद्दल कधी विचार केला आहे का?, असा प्रश्न करत तालिबानचे समर्थन करणाऱ्यांनावर योगी आदित्यनाथ यांनी टीका केली.  राज्यातील माफियांची सगळी संपत्ती जप्त केलीच परंतु ती पुर्णपणे उध्द्वस्त केली आहे. भविष्यात या जागांवर गरिबांसाठी घरं बांधणार आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये मागील चार वर्षांपासून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली असल्याचा दावा योगींनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

काय सांगता? …म्हणून चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील अधिकाऱ्याला दिलं चॅाकलेट!

बाबो! लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या ‘या’ बड्या खेळाडूने सोडला संघ

नारायण राणे संतापले; म्हणाले, “मांजरीसारखं मला आडवं येऊ नका!”

भाजप शहराध्यक्षाकडे उधारी मागणारी कमेंट अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

नेक्सॉनच्या यशानंतर येतेय टाटांची ‘ही’ इलेक्ट्रीक गाडी, फक्त 21 हजार रुपये…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More