बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईल”

लखनऊ | आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईल, असा इशारा प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी दिला आहे. शायर मुनव्वर राणा यांनी योगी सरकारवर सडकून टीका केली आहे.

माझा योगींना आक्षेप नाही. पण योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हे आवश्यक नाही. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईल. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून देईल, असं राणा म्हणाले.

जे लोक इंदिरा गांधींच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा विरोध करत होते, आता हा कायदा आणत आहेत. केवळ मुस्लिमांनाच मुलं होत नाहीत. तर हिंदूंनाही मुलं होतात. माझा या कायद्याला विरोध नाही. मात्र जनता या कायद्याला विरोध करत आहे. आमच्या मुलांचा तुम्ही एन्काऊंटर करता, मग आम्ही अशा कायद्यांना विरोध का करू नये?, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही शायर मुनव्वर राणा यांनी टीका केली. हैदराबादहून आलेल्या ओवैसीमुळे उत्तर प्रदेशात योगींचं सरकार बनत असेल तर मी सिंह आहे आणि कोलकात्यातही सिंह राहतात. मी कोलकात्याला राहायला जाईल, असं सांगतानाच ओवेसी मतांचं विभाजन करत असल्याचा दावा राणा यांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा आणखी एक धक्का!

लोकांना तीन-तीन वेळा इशारा दिला होता पण…- किशोरी पडणेकर

“…अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”

नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीत काय चर्चा झाली?, शरद पवार म्हणतात…

पुढील 24 तासात ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More