बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिमंडळ विस्तारावर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. 15 कॅबिनेट आणि 28 राज्य मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. पुढच्यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुक होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजच्या कॅबिनेट मंत्र्यांचा विस्तार करण्यात आला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिली प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशमधील नवीन मंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे.

योगी आदित्यनाथ ट्वीट करत म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खेरी संसदीय मतदार संघाचे खासदार श्री अजय मिश्रा केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार श्री बी. एल. वर्मा हे केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्याबद्दल त्यांचे देखील हार्दिक अभिनंदन.

तसेच उत्तर प्रदेशच्या जळगाव लोकसभा मतदार संघातील खासदार श्री. भानू प्रताप सिंग वर्मा केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल त्यांचे देखील चिरंतन अभिनंदन, असं ट्वीट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, निशंक यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी आणि देवश्री बॅनर्जी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून आज राजीनामा दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मोदी सरकारने लोकांना बरबाद केलं असून मंत्रिमंडळ विस्ताराने काही फरक पडणार नाही”

ईडी लावाल तर सीडी लावेल म्हणणाऱ्या नाथाभाऊंनाही ईडीची नोटीस???

प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा का घेण्यात आला?; वाचा सविस्तर वृत्त

“बारा वर्षात काँग्रेसला राणेंची किंमत काय आहे कळलं नाही ते भाजपच्या नेतृत्वाला कळलं”

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, उच्चांकी दरापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त; वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More