सत्तेसाठी भाजपनं जंग जंग पछाडलं; योगींच्या 74 तर मोदी-शहांच्या 90 प्रचारसभा

Yogi Adityanath

नवी दिल्ली | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं मतदान पूर्ण झालं आहे. या निवडणुकांच्या प्रचारसभा घेण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना धोबीपछाड दिली आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि स्मृती ईराणी हे स्टार प्रचारक होते. 

योगी आदित्यनाथांनी पाच राज्यात मिळून 74 प्रचारसभा घेतल्या तर नरेंद्र मोदींनी 32 सभा घेतल्या. अमित शहा यांनी 58 सभा घेतल्या.

दरम्यान, योगी आदित्यनाथांनी राजस्थानात 26, छत्तीसगढमध्ये 23, मध्यप्रदेशात 17 तर तेलंगणात 8 सभा घेतल्या. भाजपने याबाबत पाच राज्यांत योगी आदित्यनाथांची लोकप्रियता वाढत आहे, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राहुल गांधींची ‘ती’ मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार…

धक्कादायक! राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र

-विराट कोहली मैदानात नृत्य करतो तेव्हा..

-योगी आदित्यनाथ हे तर अंगठाछाप- असदुद्दीन ओवैसी

“मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”