लखनऊ | सतत भाजपवर आगपाखड करणारे योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री ओ. पी. राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल राम नाईक यांच्याकडे यासंबंधी शिफारस केली होती.
राजभर हे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सतत भाजप आणि योगी सरकारवर टीका केली होती. लोकसभा निवडणुका संपताच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
राजभर यांच्याकडे योदी मंत्रीमंडळात पीछडा वर्ग कल्याण आणि दिव्यांग सशक्तीकरण खाते देण्यात आले होते.
दरम्यान, राजभर यांनी याआधिच राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता.
महत्वाच्या बातम्या
-धक्कादायक! कन्हैय्या कुमारच्या समर्थकाची हत्या
-महाराष्ट्रात युतीला 42 पेक्षा जास्त जागा मिळतील- रावसाहेब दानवे
-समलैंगिक असल्याने द्युती चंदला तिच्या बहिणीने घरातून बाहेर काढण्याची दिली धमकी
-विधानसभेची तयारी पुढील महिन्यापासून- रोहित पवार
-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 24 ते 25 जागा मिळतील; अशोक चव्हाण यांचा दावा
Comments are closed.