Top News देश

हाथरस बलात्कार प्रकरणी योगी सरकारने केली मोठी कारवाई

उत्तर प्रदेश |  हाथरस येथे झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देश हादरला होता. तरीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गप्प का?, असा सवाल केला जात होता. अशातच योगी सरकारने या प्रकरणात युपी पोलिसांवर कारवाई केली आहे. यासंदर्भात ANI ने वृत्त दिलं आहे.

पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, पोलीस निरीक्षकासह इतर अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, हाथरस प्रकरणात पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षक या दोघांचीही नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. आता दोषींना काय शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून ‘बीग बी’ अमिताभ बच्चन क्रिकेट संघात सहभागी होऊ शकले नाही!

‘हाथरस प्रकरणामुळे योगी सरकारसह भाजपची प्रतिमा मलीन झाली’; भाजपच्या फायरब्रँड नेत्यानी व्यक्त केल्या भावना

‘मला वाटतं ते रात्री कपडे घालूनच तयार असतात’; शरद पवारांचा भाजपला टोला

भाजप म्हणजे नवी ईस्ट इंडिया कंपनीच- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या