योगी सरकारच्या राज्यात शेतकरी बेहाल, दलालांकडून जबर मारहाण!

हरदोई | योगी सरकारच्या राज्यात शेतकरी बेहाल झाल्याचं चित्र आहे. धान विकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सरकारी कर्मचाऱ्यांनी नागवलंच शिवाय त्याला दलालांकडून मारहाणही करण्यात आली. 

बाजारात 1200 ते 1300 रुपये धानाचा रेट आहे. तर सरकार 1590 रुपयांची धानाची खरेदी करते. त्यामुळे यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठी दलालांची टोळी सक्रीय झाल्याचा आरोप आहे. 

दरम्यान, नानक गंजच्या राजपाल नावाच्या शेतकऱ्याने दलालाची साखळी ओलांडून सरकारला धान विकण्याचा प्रयत्न केला. मात्र गुणवत्ता नाही, असं सांगत सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचं धान नाकारालं. दलालांनी बेदम मारहाण केल्याचाही त्यांचा आरोप आहे.