देश

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला योगींच्या समर्थकाची घोषणाबाजी

नवी दिल्ली | दिल्लीमध्ये काँग्रेसची सुरु असणारी दैनंदिन पत्रकार परिषदेत अचानक थांबवावी लागली. पत्रकार परिषद सुरु असताना अचानक योगी आदित्यनाथ यांच्या समर्थकाने राष्ट्रध्वज फडकवत घोषणाबाजी केली.

काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अजयसिंग बिश्त असा उल्लेख केला. त्यामुळे खवळलेला समर्थक उठला आणि पत्रकार परिषद थांबवली.

आदित्यनाथ यांना बिश्त म्हणणं म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, असं त्या समर्थकाचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याने वन्दे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या.

पवन खेरा यांनी काही काळ पत्रकार परिषद थांबवली आणि घटनेचा निषेध करत पुन्हा आपलं म्हणणं मांडलं.

महत्वाच्या बातम्या

-“मोदी मनमोहन सिंह यांची खिल्ली उडवायचे; देश आज मोदींची खिल्ली उडवत आहे”

-मोहरमची वेळ बदला, दुर्गा पुजेची नाही- योगी आदित्यनाथ

-ममता दीदींनी 24 तासातच बदला घेतला; मोदींचे ममतांवर टीकास्त्र

-आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल

-मराठा समाजातील एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या