नवी दिल्ली | माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग दिल्लीत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोहोचले होते. यावेळी बोलताना योगराज सिंग यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
योगराज सिंग यांचं एक भाषण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत.
हे हिंदू गद्दार आहे. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली, असं योगराज सिंग यांनी म्हटलं आहे. तसंच महिलांबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. अनेकांनी त्यांच्या अटकेची मागणीही केली आहे.
दरम्यान, युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असतात. यापूर्वी योगराज सिंग हे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.
महत्वाच्या बातम्या-
वाह अजित दादा वाह, लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा- निलेश राणे
शीतल आमटेंच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर!
शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?
‘एका वर्षात दोनदा सुतक लागणं हे हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही’; शिवसेनेचा भाजपला टोला
‘सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर…; या काँग्रेस नेत्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा