Yograj Singh l भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतेच टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंसाठी नवीन धोरण लागू केले आहे. या धोरणात अनेक कठोर नियम (Strict Rules) आहेत. यामध्ये परदेश दौऱ्यांवर खेळाडूंसोबत जाणाऱ्या पत्नी आणि कुटुंबावरही बंदी (Ban) घालण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन (Violation) केल्यास टीम इंडियाच्या खेळाडूंना शिक्षा (Punishment) होणार आहे. आता युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील आणि माजी क्रिकेटपटू (Former Cricketer) योगराज सिंग यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
योगराज सिंग यांची बीसीसीआयच्या (BCCI) नव्या धोरणावर प्रतिक्रिया :
योगराज सिंग यांनी बीसीसीआयच्या या नव्या धोरणाचे समर्थन केले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, ४५ दिवसांच्या दौऱ्यात पत्नी आणि कुटुंबातील सदस्य केवळ १४ दिवस खेळाडूंसोबत राहू शकतात. योगराज सिंह म्हणाले, “जेव्हा एखादा संघ दुसऱ्या देशाचा दौरा करत असतो, तेव्हा कुटुंबाला सोबत घेऊन जाण्यात काय अर्थ आहे? ते तुमचे लक्ष विचलित (Distract) करते.”
Yograj Singh l “पत्नींना क्रिकेटबद्दल (Cricket) काहीही माहिती नसते” :
पुढे योगराज सिंह म्हणाले, “निवृत्तीनंतर (Retirement) तुम्ही काहीही करू शकता. पण जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी (Country) खेळत असाल, तेव्हा तुमच्या शेफला (Chef) सोबत घेऊन जाणे अधिक ओझे होऊन जाते. पत्नींना खरंच क्रिकेटबद्दल जास्त माहिती नसते, मग तुम्हाला तुमची मुलं (Children) आणि पत्नी सोबत कशाला हवी? जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा संघ (Team) हे तुमचे कुटुंब असते, मला वाटत नाही की त्याची (कुटुंबाची) गरज आहे. मी याच्या विरोधात आहे.”
निवडकर्त्यांचे (Selectors) अभिनंदन :
योगराज सिंग यांनी शनिवारी जाहीर झालेल्या २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (2025 Champions Trophy) भारताच्या संघाच्या (Indian Team) निवडीवरही (Selection) आपले मत मांडले. योगराज सिंगने संघाच्या निवडीवर आनंद व्यक्त केला आणि निवडकर्त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा कर्णधार (Captain) असेल आणि शुभमन गिल (Shubman Gill) उपकर्णधार (Vice-Captain) असेल. भविष्यात गिलला संघाचे नेतृत्व (Leadership) करण्याची संधी मिळणार आहे.”
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली (Virat Kohli), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), ऋषभ पंत (यष्टीरक्षक – Wicket Keeper), केएल राहुल (यष्टीरक्षक – Wicket Keeper), हार्दिक पंड्या (Hardik Pandya), अक्षर पटेल (Axar Patel), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी (Mohammed Shami), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal).
News Title : Yograj Singh supports BCCI’s new policy, says ‘No need to take family on overseas tours’