बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकार सत्तेतून जाईपर्यंत कपडे न घालण्याचा तरूणाचा निर्धार

नाशिक | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिकमधील प्रचारसभेत अर्धनग्न अवस्थेत एक तरूण स्टेजवर पवारांना निवेदन देण्यासाठी आला. जो पर्यंत भाजप सरकार राज्यातून आणि केंद्रातून जात नाही तो पर्यंत कपडे घालणार नसल्याचं त्या तरूणाने स्टेजवर येऊन सांगितलं.

कृष्णा डोंगरे असं या तरूणाचं नाव आहे. कृष्णा भाजप सरकारचा निषेध म्हणून विना कपड्याचा फिरत आहे. या तरूणाने शरद पवारांना भेटून त्यांना निवेदन दिलं.

कृष्णा डोंगरे यांनी जमिनीच्या प्रश्नावरून काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होत. पण सरकारने दडपशाही केल्याचा आरोप डोंगरेनी केला आहे.

दरम्यान, मोदी शेतकऱ्यांसाठी काय तरी करतील म्हणून त्यांना 2014 ला निवडून दिलं. पण त्यांनी शेतकऱ्यांचे खूप हालं केले आहेत, असं त्या तरूणाने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-“पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत की ‘पबजी’ खेळत आहेत?”

-भाजपला धक्का; विद्यमान खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गांधी-नेहरू कुटुंबीयांवर टीका करण्यापेक्षा 5 वर्षात काय केलं ते सांगा- प्रियांका गांधी

उमेदवारी अर्ज भरताच गंभीरही झाला ‘चौकीदार’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More