“प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आणि मते मिळवायची, असं हे भाजपचं राजकारण”
मुंबई | रशिया आणि युक्रेन यांच्यीतील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने उशीर केला, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले आहे. त्यानंतर केंद्र सरकार चार मंत्री पाठवून केंद्र सरकार इव्हेंट करत आहे. खरं तर सर्व भारतीय मुलांना यापूर्वीच वाचवायला हवं होतं, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. रशिया आणि युक्रेनची लढाई सुरू झाली आहे आणि आता मोदी सरकार बैठका घेत आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.
अमेरिकेने ज्याप्रमाणे अगोदरच सर्व नागरिकांना बोलवून घेतले त्यापद्धतीने आपल्या देशाने करायला हरकत नव्हती. चार मंत्री पाठवून इव्हेंट केला जातोय, याला अर्थ नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आणि मते मिळवायची अशा पद्धतीच भाजपचं राजकारण आहे, असा घणाघात छगन भुजबळ यांनी केला आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी बोलताना ओबीसी आरक्षणावर भाष्य केलं आहे. आम्हीही ओबीसी आरक्षणाच्या विषयासंदर्भात वाट पाहात होतो. न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल, अशी अपेक्षा होती. कारण आम्ही तिन्ही टेस्ट केल्या आहेत. या कारणामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल,अशी आशा आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
ज्याची भीती होती शेवटी तेच झालं; रशियाने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
युक्रेनमधील भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
निलेश राणेंच्या नव्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले…
“लवासाप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही”
“सरकार त्यांचं मुख्यमंत्री त्यांचे मग राऊतांना पंतप्रधान कार्यालय कशाला हवं?”
Comments are closed.