Top News महाराष्ट्र मुंबई

‘सामना’च्या अग्रलेखातील भाषेबाबत रश्मी वहिनींना पत्र लिहिणार- चंद्रकांत पाटील

मुंबई | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर ‘सामना’तून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली त्याबाबत मी ‘सामना’च्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

तुम्ही ‘सामना’च्या संपादिका आहात, म्हणजे हा अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. ही तुमची भाषा असू शकत नाही. मग अग्रलेखात ही भाषा कशी? असा प्रश्न त्यांना विचारणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करणं हा आमचा राजकीय मुद्दा नाही, निवडणुकीचा नाही तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला? ते आधी हटवा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे, शिवसेनेला नामांतर करायचं आहे, पण या विषयात आम्हाला पडायचं नाही. पण औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर झालं पाहिजे ही आमची 100 टक्के भूमिका आहे, असंही पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू!

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आरोग्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

कोरोना रुग्णांना वाचवण्यात भारत इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने आघाडीवर- नरेंद्र मोदी

कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही- अजित पवार

“निवडणूक जवळ आल्यावरच शिवसेनेला औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या