नवी दिल्ली | नोकरी करणाऱ्या अनेकांची इच्छा असते की आपला स्वत:चा बिझनेस असावा. मात्र नोकरी आणि व्यवसाय यात समतोल राखणं अनेकदा अवघड जातं. पण एक बिझनेस असाही आहे जो तुम्ही नोकरी सांभाळत देखील करू शकता.
लोणचे बनवण्याचा व्यवसाय असा आहे जो तुम्ही घरातूनही सुरू करू शकता. त्यामुळे बिझनेससाठी वेगळी जागा शोधण्याची गरज नाही. शिवाय नोकरी करत करत व्यवसाय केला तर अतिरिक्त नफा देखील मिळतो.
अगदी 10 हजार रूपयांपासून लोणच्याचा व्यवसाय सुरू करता येतो. या व्यवसायातून तुम्ही महिन्याला 25 ते 30 हजारांपर्यंत जास्तीची कमाई करू शकता. तुमच्या उत्पादनाची मागणी, पॅकिंग यासारख्या गोष्टींवरही कमाई अवलंबून असते. घाऊक आणि किरकोळ बाजार तसेच ऑनलाईन बाजारातही लोणची विकू शकता.
दरम्यान, मोदी सरकारच्या अनेक अशा योजना आहेत ज्या स्टार्टअप बिझनेसला मदत करतात. मात्र, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना आवश्यक आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAIकडून हा परवाना मिळू शकतो. यासाठी ऑनलाईन अर्ज देखील करता येतो.
थोडक्यात बातम्या-
सकाळी उठताच तुम्हालाही ‘या’ गोष्टी करायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा
भाजप-सेनेची युती होणार?, ‘या’ भेटीमुळे चर्चांना उधाण
“…त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार पडणार, दिवा विझण्यापुर्वी फडफडतो”
सुप्रिया सुळेंना सातव्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार, 11 पैकी 4 महाराष्ट्राचे खासदार
आर्यन खानची लवकरच होणार बाॅलिवूडमध्ये एन्ट्री; अॅक्टींग नाही तर ‘हे’ काम करणार
Comments are closed.