नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. अनेक युवक नोकरीच्या शोधात असतात. आता नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाझेशनमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. रिक्त पदे भरण्याकरिता NTRO ने अर्ज मागवले आहेत. सल्लागार पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 25 मार्चपर्यंत अर्ज करायचे आहेत.
कन्सल्टंट चिनी भाषा या पदासाठी भरती होणार आहे. चिनी भाषेतील भाषांतर किंवा चीनी भाषेत पदव्युत्तर पदवी तसेच डिप्लोमासोबतच पदवी पर्यंत शिक्षण घेतलेलं असावं. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला चिनी भाषा आणि भाषांतराचा काही अनुभव असणं आवश्यक आहे.
पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं असावं. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पहिल्या वर्षी 41 हजार 333 तर दुसऱ्या वर्षी 44 हजार आणि तिसऱ्या वर्षी 48 हजार रूपये प्रतिमहिना दिला जाणार आहे.
दरम्यान, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाझेशनमध्ये नोकरी करण्यासाठी बायोडाटा, दहावी आणि बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला देणं आवश्यक आहे. तसेच ओळखपत्र, पासपोर्ट साइज फोटो या गोष्टी द्याव्या लागणार आहेत.
थोडक्यात बातम्या-
रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा!
रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय; फक्त ‘या’ प्रवाशांना मिळणार सवलत
“काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आमदार बनवून दाखवतो”
“यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना आता…”
मोठी बातमी! केंद्र सरकारने कोरोना निर्बंध हटवले, ‘या’ 2 अटी मात्र कायम
Comments are closed.