सिडनी एकदिवसीय सामन्यात नोंदवलेले ‘हे’ 9 विक्रम तुम्ही वाचाच!

सिडनी | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात तब्बल 9 विक्रमांची नोंद करण्यात आली आहे. 

1- ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचं आजचं हे सातवं धमाकेदार शतक ठरलं आहे. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतकं झळकावली आहेत.

2- महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय सामन्यात 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 5 वा फलंदाज ठरला आहे.

3- एकदिवसीय सामन्यात 125 पेक्षा जास्त धावा काढण्याची रोहित शर्माची ही 14 वी वेळ ठरली आहे. आजच्या सामन्यात रोहितने 133 धावांची खेळी केली. एकदिवसीय सामन्यात सचिन तेंडुलकरने 19 वेळा अशी कामगिरी केली आहे.

4- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला ऑस्ट्रेलिया संघाचा हा 1 हजारावा विजय ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मागोमाग इंग्लंडने 774, भारत 711 आणि पाकिस्तानने 702 विजय मिळवले आहेत.

5- एकदिवसीय सामन्यात 22 डावांनंतर कोहली एकअंकी धावसंख्येवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. 2017 साली चेन्नई एकदिवसीय सामन्यात विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकअंकी धावसंख्येवर बाद झाला होता.

6-  महेंद्रसिंह धोनीचं एकदिवसीय सामन्यात हे दुसरं संथ अर्धशतक ठरलं आहे. धोनीने आजच्या सामन्यात 93 चेंडूत 50 धावा पटकावल्या. याआधी धोनीने विंडीजविरुद्ध 2017 साली 108 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

7-  रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 64 षटकार लगावले आहेत. त्याने शाहिद आफ्रिदीचा श्रीलंकेविरुद्ध 63 षटकारांचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

8- रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 26 षटकार लगावले आहेत. या कामगिरीसह रोहितने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा 25 षटकारांचा विक्रम मोडला आहे.

9- पाहुण्या फलंदाजाने एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरोधात सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने सर व्हिविअन रिचर्ड्स यांना मागे टाकलं आहे. रिचर्ड्स यांनी 3 शतकं झळकावली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-…अन्यथा उत्तर प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू!- काँग्रेस

-…जेव्हा DRS भारतीय संघाला महागात पडतो आणि भारताचा पराभव होतो!

-…तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेन- सुप्रिया सुळे

-ऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधाराकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक!

-एकदा चार्ज केल्यावर ही वाहने 800 किमीपर्यंत धावणार