बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्हॉट्सअॅपला ब्लॉक केल्यावरही करता येणार चॅट; जाणून घ्या कसं?

नवी दिल्ली | देशात दिवसेंदिवस मेसेजिंग अॅपचा वापर वाढत आहे. अशातच व्हॉटसअॅपच्या एका नवीन फीचर बद्दल माहिती सांगणारी ही बातमी आहे. अनेकदा व्हॉटसअॅप वापरत असताना काही नाराज झालेल्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून आपल्याला ब्लॉक केलं जातं. अशा वेळी त्यांच्यासोबत बोलणं शक्य होत नाही. परंतु, आता कोणाकडून ब्लॉक झाल्यानंतरही त्या व्यक्तीशी बोलणं शक्य झालं आहे. यासाठी काही ट्रीक्स आहेत.

ज्याला ब्लॉक केलं आहे त्या युजरने दुसऱ्या एका व्हॉट्सअप अकाऊंटवरून व्हॉटसअप ग्रुप तयार करावा लागेल. ज्या युजरने ब्लॉक केलं आहे त्या युजरला त्यात अॅड करावे लागेल. त्या युजरने ग्रुपवर मेसेज केल्यानंतर तो दोघांनाही दिसेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते दोनही युजर्स चॅट करू शकतात.

अनब्लॉक होण्यासाठी काय कराल?

सर्वात आधी व्हॉटसअॅप ओपन करा. त्यानंतर सेटींगमध्ये जाऊन अकाऊंट या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला डिलीट माय अकाऊंटचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला डिलीट हिस्ट्री आणि लेफ्ट ग्रुप्सचा ऑप्शन दिसेल. कंट्री सिलेक्शनचा पर्याय स्क्रिनवर दिसेल. त्यात मोबाईल नंबर एन्टर करा. अशाप्रकारे तुमचं व्हॉटसअप अकाउंट डिलीट होईल.

यानंतर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नवीन व्हॉट्सअॅ प इन्स्टॉल करा. त्यात मोबाईल नंबर टाकून चालू केल्यानंतर कॉन्टॅक्ट लिस्ट तुमच्या व्हॉटसअपशी जोडली जाईल. त्यानंतर ज्या युजर्सने तुम्हाला ब्लॉक केलं आहे त्या युजर्सशी रिकनेक्ट होता येईल. कारण आता अकाउंट अनब्लॉक झालेलं असतं. अशा प्रकारे तुम्ही अनब्लॉक होऊन नाराज व्यक्तीशी संवाद साधू शकता.

थोडक्यात बातम्या

“पण आताही अंधभक्त बोलतील काय हा साहेबांचा मास्टरस्ट्रोक”

भारतातील पेट्रोल-डिझेल आता अमेरिका स्वस्त करणार?; काय आहे नवा प्लॅन?

18 वर्षांवरील सर्वांनाच बुस्टर डोस देण्याबाबत ‘या’ सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

चित्रा वाघ यांच्या आमदारकीच्या चर्चांना पूर्णविराम; भाजपकडून ‘या’ उमेदवाराला संधी

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More