नवी दिल्ली | लवकरच कोरोनाची लस येणार असून लसीकरणाला सुरुवात होईल. मात्र भारतात कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तींना लसीकरणानंतर काही दिवस मद्यपान करता येणार नाहीये.
इंडियन कॉऊंसिल फॉर मेडिकल रिसर्चचे आरोग्य अधिकारी डॉ. समीरन पांडे यांच्या सांगण्यानुसार, भारत बायोटेककडून तयार करण्यात आलेली कोवॅक्सीन ही लस घेतली तर 14 दिवसांपर्यंत मद्यसेवन करण्यास पूर्णपणे मनाई असणारे.
जगात कोरोनाचं लसीकरण प्रथम रशियामध्ये सुरु करण्यात आलं. दरम्यान रशियाममध्ये देखील कोरोनावरील स्पूतनिक व्ही ही लस घेतल्यावर 2 महिने मद्यसेवन न करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, कोरोनाची लस घेण्याअगोदर 7 दिवस आधीच नागरिकांनी मद्यपान बंद करावं. मद्यपान केल्यास शरीरामध्ये अँटीबॉडी तयार करण्यास अडथळा येऊ शकतो.
थोडक्यात बातम्या-
“उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना”
मला केंद्रात मंत्रिपद मिळालं तरी…- सुजय विखे-पाटील
कोहलीच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी- गौतम गंभीर
“इंग्लंडमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा जास्त बाऊ करु नका, त्याऐवजी…”
नाईट कर्फ्यूच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक नाराज; शरद पवारांची घेणार भेट