बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपल्या करिअरचं काही सांगता येत नाही, सेव्हिंग्स पाहिजेच”

मुंबई | कोरोनाकाळात अनेक कलाकारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. ‘नदिया के पार’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज यांनी सुद्धा आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचा खुलासा केला होता. यावर त्यांच्याकडे आजारपणावर उपचार करण्यासाठी देखील पैसे नसल्याचं समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता अभिनेते सचिन पिळगावकर यांनी भाष्य केलं आहे.

मी वर्तमानपत्रांमध्ये सविता यांच्याविषयी वाचले. असोसिएशनच्या लोकांनी पुढे येऊन त्यांना मदत करावी. आर्टिस्ट आणि काही टेक्निशियन्स यांची देखील त्यांनी मदत करावी. जर तुम्ही CINTAA आणि IMPPAकडे मदत मागितली तर ते तुमची मदत नक्की करतील. त्यामुळे तुम्ही सदस्य असणे महत्वाचे आहे, असं सचिनने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

पुढे सचिननं म्हटलं की, तुम्हाला तुमची सेव्हींग ठेवलीच पाहिजे. कधीही काहीही होऊ शकतं. जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की, आपल्या करिअरचा काहीच भरोसा नाही.

दरम्यान, पैसे वाचवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा अशी एखादी गोष्ट होते तेव्हा लोक त्या कलाकारालाच दोष देतात की त्याने स्वतःवर ही वेळ येऊ दिली. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असंही सचिनंनं म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ‘एवढे’ लाख नागरिक बाधित होतील; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला अंदाज

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला पंतप्रधानांची फक्त 3 मिनिटांची हजेरी; विरोधक आक्रमक

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

राहुल-दिशाच्या लग्नानंतर आता राखी म्हणतेय, ‘पुढच्या वर्षी माझ्या लग्नाला यायचं’

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 97 टक्क्यांवर

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More