मुंबई | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही अधिवेशन वादळी ठरल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण जोरदार पेटल्याचं पहायला मिळत आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यावरुन त्यांनी छगन भुजबळ यांनाही सुनावलं. छगन भुजबळ यांच्यावर कुणाचा दबाव आहे का?, असा खोचक सवाल फडणवीसांनी केला आहे. अशातच आता भुजबळांनीही फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आरक्षणाची केस कोर्टात गेली तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात. पाच वर्षात काही करू शकला नाहीत आणि आम्हाला 15 दिवसात करायला सांगता, असं भुजबळांनी सुनावलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडलेला अंतरीम अहवाल काल कोर्टाने फेटाळून लावला. त्यानंतर राज्यभर याचे पडसाद पहायला मिळाले. विरोधकांनी तर जोरदार टीकास्त्र सोडलेली पहायला मिळाली.
थोडक्यात बातम्या –
‘ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून भुजबळांवर कोणाचा दबाव आहे का?’; फडणवीसांचा हल्लाबोल
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या
“प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात ‘भाजपाल’ आहे”
मोठी बातमी! युक्रेनमधून निघालेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली
Audi कंपनीचा ग्राहकांना झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.