बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही नामर्दपणे टीका केली”; संजय राऊत भडकले

मुंबई | आज देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे सगळीकडे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं पहायला मिळत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ध्वजारोहनाला हजेरी लावली. त्यामुळे सध्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरुन आरोप-प्रत्यारोप होत असलेले पहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यापासून कित्येक दिवस ते घरीच होते. घरुनच ते राज्याचा कारभार सांभाळत होते. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पहिल्यांदा ते बाहेर पडले असून ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही नामर्दपणे टीका करत होते. या नामर्दपणाला मुख्यमंत्री आणि जनतेने चांगलेच उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री स्वतः शिवाजी पार्क येथे आले होते. ज्या कोणी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नामर्दपणाची वक्तव्ये केली त्यांना चपराक बसली आहे.

पुढे राऊत यांनी म्हटलं की, तरीही मी वारंवार सांगत होतो, मुख्यमंत्री येणार आहेत. आजारपण कोणावरही येऊ शकतो. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा अशा गंभीर दुखण्यातून जात होते तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेत होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाच्या पुढच्या व्हेरियंटविषयी WHOचा गंभीर इशारा, म्हणाले…

एसटी कर्मचाऱ्यांचं कुटुंबासह ‘भीक मांगो’ आंदोलन, ‘या’ ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या नावाने मागतायेत भीक

Republic Day 2022: शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बाहेर, ध्वजारोहन सोहळ्याला लावली हजेरी

Republic Day 2022: जीवघेण्या थंडीतही जवानांनी ‘इतक्या’ फूट उंचीवर फडकवला झेंडा

येत्या 2 ते 3 दिवसांत ‘या’ भागात कडाक्याची थंडी, हवामान विभागाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More