“मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळं तुम्ही कोणलातरी पकडून…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई | राज्यातील वातावरण सध्या अनेक मुद्द्यांनी गाजत आहे. अशातच सध्या देशात होणाऱ्या हिंसाचारावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) जबाबदार ठरवत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळातील वातावरणही जोरदार पेटल्याचं पहायला मिळत आहे.
‘देशभरामध्ये जे दंगे सुरू आहेत हे देशातील सत्ताधारी पक्ष भाजपने प्रायोजिक केले आहेत. याआधीही जनतेनं रामनवमी आणि हनुमान जयंती सारखे सण साजरे केले आहेत. तेव्हा दंगली झाल्या नाहीत’, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.
मुंबईमध्ये (Mumbai) भोंग्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतही तुम्ही हाच तणाव निर्माण केला आहे. मुंबईत तुमची ताकद नाही. त्यामुळं तुम्ही कोणलातरी पकडून हे काम दिलं आहे. तुम्ही भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. पुन्हा राजकीय फायद्यासाठी दंगलींचे राजकारण केलं, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, देशाची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. हिंसाचाराच्या आणि दंगलींच्या घटनेनं देशाचं वातावरण ढवळून निघालं आहे, असंही राऊत म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
जो बायडन युक्रेनला जाणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
“सिल्वर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला”
मोठी बातमी! मुंबई महापालिकेचा नारायण राणेंना झटका
“…अशा पोरखेळांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही”
“गिरीश महाजनांनी मुलाबाळांची शपथ घालून सांगावं निधीसाठी माझे पाय धरले की नाही”
Comments are closed.