बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्हाला सत्ताच हवीय ना, मी तुमच्यासोबत येतो, टाका मला तुरुंगात”

मुंबई | राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून गेल्या काही दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर देखील ईडीने कारवाई केली आहे. शुक्रवारी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपला  खुलं आव्हान दिलं आहे.

तुम्हाला सत्ता पाहिजे ना, सगळ्यांच्या समोर सांगतो. पेनड्राईव्ह गोळ्या करू नका. ज्यांना पेनड्राईव्ह पाहिजे असेल त्यांना द्या. मी तुमच्यासोबत येतो, सत्तेसाठी येत नाही. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार. कुटूंबियांवर धाडी टाक हे सगळे जे तुम्ही चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो, टाका मला तुरूंगात, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिलं आहे.

मी तुमच्या कुटूंबाच्या कधी भानगडी काढल्या?, याचं शेपूट त्याला त्याचं शेपूट याला जोडलं जात आहे. मी थोडसं भावनिक होऊन बोलतो. बाबरीच्या खाली रामजन्मभूमी होती. तसं कृष्णजन्मभूमीच्या खाली तुरूंग असेल तर बघा. मला टाका तुरुंगात. मी कृष्ण नाही. मात्र, तुम्ही कंस बनू नका, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, बाळासाहेबांना काय उत्तर देणार असं मला विचारलं जात. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं ते तरी काय उत्तर देणार?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. देशात सर्व सांगत होते हे नको, हे नको. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते हे राहुद्या, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आम्ही थांबणार नाही”

मोठी बातमी! शिवसेनेचा आणखी एक बडा नेता ईडीच्या रडारवर, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

मोठी बातमी! पुतिन यांचा रशियन सैन्याला मोठा आदेश

…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं!

“यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More