बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तू तर अंतर्वस्त्र घालायची विसरली’, बोल्ड लुकमुळे ‘ही’ अभिनेत्री होतेय ट्रोल

मुंबई | प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अभिनेत्री प्रियांका उध्वानीने केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. अनेकांनी तिच्या या बोल्ड फोटोंवर कमेंट केली आहे. प्रियांका संबंधित मालिकेतून लोकांसमोर आली होती. याच मालिकेमधील एका कलाकारासोबत प्रियांका प्रेमसंबंधांमध्ये असून तिच्या प्रियकरासोबत तिने हा फोटोशूट केला आहे.

‘ये रिश्ता क्या कहलता है’ या मालिकामध्ये प्रियांकाने करिश्माची भूमिका साकारली असून या मालिकेतील नमन म्हणजेच अभिनेता अंशुल पांडेला ती मालिकेपासून डेट करत होती. दोघेही सतत आपले खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या चाहत्यांना त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात आवडतात सुद्धा.

नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये प्रियांका काळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसत आहेत. समोरून ओपन असणाऱ्या या कोटमध्ये प्रियांका खुपच बोल्ड दिसत आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुक होत आहे. तर काही युजर्स ट्रोल देखील करत आहेत. कमेंट करत प्रियांकाला काहींनी हॉट म्हटलं आहे, तर एकाने ट्रोल करत म्हटलं आहे, ‘तू अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस, लाज वाटते तुझी’. अशा भाषेत प्रियांकाला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, बऱ्याचवेळा अभिनेत्रींना आपल्या हटके स्टाईलमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असंच काहीसं अभिनेत्री प्रियांका उध्वानीसोबत झालं आहे. प्रियंकाने नुकताच आपल्या बॉयफ्रेंडसोबत शेअर केलेल्या बोल्ड फोटोमधील तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka Udhwani (@priyankaudhwani)

थोडक्यात बातम्या- 

“चंद्रकांंत पाटलांची अवस्था ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी झालीय”

सनी लिओनचा ‘हा’ न्यूड फोटो सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल

राम राज्याची आस्था दाखवून खिसे भरण्याचं काम चालू आहे – इम्तियाज जलील

‘पवित्र रिश्ता-2’ मध्ये सुशांतच्या जागी दिसणार ‘हा’ अभिनेता

सावधान! लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More