बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मारूतीच्या साक्षीने तुम्ही शब्द देऊन गेला पण दोन वर्ष बघितलं नाय अन् आता परत आलाय”

कोल्हापूर | गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणचं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नेत्यांच्या दौऱ्यांचा पूर आला आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेते प्रत्यक्ष जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी नागरिक नेत्यांपुढे व्यक्त होत आपल्या भावना मांडत आहेत.

अशातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जाव लागलं आहे. आश्वासन देऊन ते पूर्ण न केल्यानं आज कोल्हापूरातील चिखली गावातील ग्रामस्थांनी फडणवीसांना खडेबोल सुणावले आहेत. मारूतीच्या साक्षीने तुम्ही शब्द देऊन गेला पण दोन वर्ष बघितलं नाही आणि आता परत आलाय, असे एका ग्रामस्थाने भाजप नेत्यांना सुनावले आहे.

कोल्हापूरातील चिखली गावातील पाहणी दौरा उरकून फडणवीस ग्रामस्थांशी संवाद साधत होते. यावेळी एका ग्रामस्थाने फडणवीसांचं बोलणं अर्ध्यात थांबवून पोटतिडकीने ओरडत आपल्या व्यथा मांडण्यास सुरुवात केली.

‘साहेब मागच्या वेळेला चंद्रकांतदादा आले होते. याच मंदिरात त्यांनी पण शब्द दिला होता. आमचा मारुती साक्षीला आहे. त्यानंतर दोन वर्ष कुठे गेलं हो प्रशासन’, असा सवाल उपस्थित करत या ग्रामस्थाने संताप व्यक्त केला आहे. तसेच इथून जाऊन तुम्ही तुमच्या कामाला लागणार आम्ही आमच्या, परत कोणी इकडे येणार नाही, असं देखील या ग्रामस्थाने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

पुरग्रस्त भागात वीज बिल वसूलीबाबत उर्जामंत्र्यांचे ‘हे’ आदेश

पतीच्या बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पत्नीने रंगेहाथ पकडलं अन् घडला अनपेक्षित प्रकार!

पुण्यासह ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी; कोकणातही पाऊस परतणार?

“मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे”

सलग तीन दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More