तुमची 56 इंचांची छाती आहे, मग ‘कुलभूषण’ला का सोडविले नाही?- शरद पवार

सातारा | तुमची 56 इंचांची छाती आहे, तर मग कुलभूषण जाधवला का सोडविले नाही?, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. कराड येथे आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. तेव्हा ते बोलत होते.

गेल्या दोन वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, त्याचे सोयररसुतक मोदी सरकारला नाही, असंही पवार म्हणाले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट नव्हती, त्यामुळे मत विभागणी झाली आणि मोदींनी दिलेल्या ढीगभर आश्वासनांना जनता भूलली, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दरम्यान, सत्तेचा गैरवापर, लोकांची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक, तरुणांना बेकार कसे करावे, याचा उत्तम नमुना म्हणून या मोदी सरकारकडे पाहिले पाहिजे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-“मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचं आश्वासन दिलंय, आता शेवाळेंना भरघोस मतांनी निवडून आणणार”

–मुख्यमंत्र्यांच्या मिठीने जानकरांचं बंड एका मिनीटात थंड!

–चौकीदार होऊन देश विकण्यापेक्षा डान्सर होऊन कला विकणं कधीही चांगलं- सपना चौधरी

–भाजपमध्ये जाणार नाही पण अपक्ष लढणार- अब्दुल सत्तार

–दिलीप गांधी बंडांच्या तयारीत; सुजय विखेंच्या अडचणी वाढणार???