बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?’; फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल

मुंबई | विधानसभा अध्यक्षाच्या पदासाठी निवडणूक घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. परंतू निवडणूक घेण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्यावरून विरोधी पक्षनेते सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अध्यपदाच्या निवडणुकीवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

आमच्याकडे मेजॉरिटी आहे, असं महाविकास आघडी म्हणत असते. मग मेजॉरिटी आहे तर घ्या मतदान पाहूया ताकद, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला एकप्रकारे चॅलेंज दिलं आहे. तसेच महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भुजबळ आणि फडणवीसांमध्ये इम्पेरिकल डाटा संबंधीत चर्चा झाली. त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना मराठा आरक्षणावेळी त्यांनी कसा डेटा गोळा केला हे सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने तो कसा व्हॅलिड ठरवला हेही सांगितलं. तसेच तुम्ही पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्या, मी पर्सनली नोट तयार करुन देईन, मी तुमच्या सोबत काम करेन, असं आश्वासनही फडणवीसांनी भुजबळांना दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत WHO नं दिला हा गंभीर इशारा!

“…तर राहुल गांधी आजच्या युगातले तेनाली रामन असावेत”

कोरोना लस घेतल्यानंतर परिणीती चोप्राची झाली ‘अशी’ अवस्था!

नेहा कक्कर गरोदर?; एअरपोर्टवरील लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

“किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More