“रामाकडे जावा नाहीतर काशीत अंघोळ करा, जनतेच्या मनातून तुम्ही उतरले आहात”
सोलापूर | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टोला लगावला. सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर गेले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली.
तुम्ही रामाकडे जा नाहीतर काशीत अंघोळ करा, राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही कधीच उतरले आहात. एकीकडे रामनामाचा जप करायचा आणि दुसरीकडे काँग्रेसला हिरवा झेंडा नाचवायला द्यायचा दोन्ही गोष्टी एकावेळी शक्य होईल?, असा प्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसतात आणि आदित्य ठाकरे हे देशाच्या वाऱ्या करत बसतात. राम मंदिर बांधायची हिम्मत नव्हती आणि आता आयोध्येला जात आहेत, अशी बोचरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
दैहूतील पंतप्रधानाच्या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू न देणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना समाचार घेतला. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? .मला या लोकांचं हसूच येतं असंही ते पुढे म्हणाले.
थोडक्यात बातम्या
“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”
प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारण्याचे कारण काय?; शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं
‘आदित्य ठाकरेंचं लवकर शुभमंगल होवो आणि…’; भाजप खासदाराच्या खास शुभेच्छा
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येतबाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
Comments are closed.