“तुमच्या कुंडल्या तुम्हालाच तुरूंगात बसून पाहाव्या लागणार, आमच्या हातात सुद्धा बरचं काही आहे”
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष कमालीचा वाढला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी करण्यात येत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी बोलताना किरीट सोमय्यांच्या भ्रष्टाचाराची रोज एक प्रकरणे बाहेर काढणार असल्याचं म्हटलं आहे. ईडी कार्यालयामध्ये आम्ही लाखो लोक लवकर जाणार आहोत. तुम्ही आमच्या पाच पंचवीस हजाराची चौकशी करताना? आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील हजारो कोटी रूपये कसे लुटले गेले, याची माहिती देणार आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आम्ही तुम्हाला उघडं केल्याशिवाय राहणार नाही आणि कुंडल्या काढण्याच्या वगैरे धमक्या देऊ नका. तुम्हाला तुरूंगात बसून तुमच्याच कुंडल्या पाहाव्या लागणार आहेत. याच्या कुंडल्या आहेत, त्याच्या कुंडल्या आहेत. तुमच्या कुंडल्या नाहीत का आमच्याकडे?, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे.
दरम्यान, हे महाराष्ट्र सरकार आहे. तुमचं असेल केंद्र सरकार, इथे सुद्धा महाराष्ट्राचं सरकार आहे. ते व्यवस्थित आणि मजबूत आहे. आमच्या हातात सुद्धा बरचं काही आहे. तेव्हा उगाचं पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका. त्यात तुम्हीच फसणार आहात, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तुम्हाला काळ तोंड करून जावं लागेल, हे धंदे बंद करा, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी सुनावलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“रिश्ते में हम आपके बाप लगते है; ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचंय ते लावा”
जिओला सर्वात मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटी ग्राहकांनी सोडली साथ
मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला
“योगी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपला मतदान करा”
Kirit Somaiya: “उद्धव ठाकरे हिंमत असेल तर मला अटक करा”
Comments are closed.