बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नजर लागू नये म्हणून काळं तीट लावावं लागतं, ती लावणारी लोकं इथं आहेत”

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग मधील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यातील इतर मंत्री आणि आमदारांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. हे ही खरं आहे की, या व्यासपीठावर राज्यातील सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. त्यामुळं विकासासाठी अलायन्स आहे. एखादी चांगली गोष्ट असेल तर, नजर लागू नये म्हणून काळा तीट लावावा लागतो. ते लावणारे काही लोक इथं उपस्थित आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.

पुढं बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नारायण राणे आपण म्हणाला आहात ते खरं आहे. आपण काही चांगल्या गोष्टी केल्या त्यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो. पण, कोकणातील जनता कधीही डोळे मिटून राहत नाही.

तसेच, ती शांत आणि संयमी आहे म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन काहितरी करेल असं नाही. ती मर्द आहे. म्हणूनच या भूमीने हक्काचा लोकप्रतिनिधी दिला आहे. विनायक राऊत इथून निवडून आले आहेत, त्यांचा मला अभिमान आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

“खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी बाहेर काढलं होतं”; राणेंच्या ‘त्या’ वाक्याचा फडशा!

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला, नाहीतर कोणीतरी म्हणेल मीच बांधला”

नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमोर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंनी ना एकमेकांकडे पाहिलं, ना नमस्कार केला!

“कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही”

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचाही आर्यनला पाठिंबा?, अरविंद सावंतच्या वक्तव्यानं खळबळ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More