बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा काच शिल्लक ठेवणार नाही”

मुंबई | सोलापुरमध्ये भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना बुधवारी घडली होती. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसबीआय कॉलनी, मड्डे वस्ती भागात बैठकीसाठी आले असता अज्ञात युवकाने त्याच्या गाडीवर दगडफेक केली. या घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा निलेश राणे यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

मी स्वत: या संदर्भातील तक्रार देणार नाही. आज माझा आवाज बंद करण्यासाठी गाडीवर दगडफेक करणार असेल, याला मी भीती वगैरे दाखवावी असा गैरसमज झाला असेल, उद्या मला गोळ्या जरी घातल्या तरी मी विचारांपासून मागे हटणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

दरम्यान, शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. तर शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीवर ‘रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात, असंही पडळकर म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

राज्यपालांच्या पत्रावर नवाब मलिकांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

…तोपर्यंत महाविद्यालये सुरु करता येणार नाही- उदय सामंत

“महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावं लागतं”

सरकारला कसं अडचणीत आणायचं?, फडणवीसांच्या घरी प्लॅन ठरला

“ममतादीदींप्रमाणे सुल्तानी पद्धतीने ईडी आणि सीबीआयचा सामना करायला हवा”

उद्या गोळ्या जरी घातल्या तरी विचारांपासून मागे हटणार नाही- गोपीचंद पडळकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More