बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! किंग कोब्रा सर्पमित्रावर गेला धावून, फणा पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा, पाहा व्हिडीओ 

नवी दिल्ली | सोशल मीडियावर विषारी सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सापांमध्ये किंग कोब्राची सगळ्यात विषारी साप आहे. सर्पमित्र आपला जीव धोक्यात घालून सापांना रेस्क्यू करतात. मात्र काहीवेळा साप सर्पमित्रांनाही दंश करतात. त्यामुळे साप पकडताना डोळ्याची पापणी लवली तरी साप काय करेल सांगता येत नाही. अशाच प्रक्रारे कर्नाटकमध्ये 14 फुटाच्या किंग कोब्राला रेस्क्यू करतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये किंग कोब्रा एका घरामध्ये शिरताना दिसत आहे. त्यावेळी सर्पमित्र त्याला पकडण्यासाठी सापाची शेपटी पकडतो. मात्र साप वीजेच्या गतीने मागे येतो आणि मोठा फणा काढतो. तेव्हा त्याच्या हातात असलेली स्टिक उडून पडते. सापाला बघून सर्पमित्राला घाम फुटलेला व्हिडीओमध्ये दिसत आहे. सर्पमित्राने सापाला पकडून जंगलात सोडून दिलं.

व्हायरल झालेला व्हिडीओ कर्नाटक राज्यातला आहे. साप पकडताना सर्पमित्रांनी कशी काळजी घ्यायला हवी हे सर्पमित्र दाखवत आहे. त्यानंतर या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तर सापांना न मारत त्यांना जीवनदाव द्यायला हवं,अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान,  IFS अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सापाला रेस्क्यू करताना किंग कोब्राला पकडताना काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी, असं त्यांनी त्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राणे कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा”

1 नोव्हेंबर पासून ‘या’ स्मार्टफोन, अॅन्ड्रॉईडफोनमधून व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणार

कोरोनाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून किशोरी पेडणेकरांचा यु टर्न; म्हणाल्या…

“मराठा आरक्षण बैठकीला सरकार तयार होत नसेल तर…’; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

“डिस्को आणि बार ही काय आरोग्य केंद्रे आहेत का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More