बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बँक संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे फक्त 3 दिवस; ‘या’ कारणाने पुढचे 8 दिवस बँक राहणार बंद

मुंबई | जर तुम्हाला बँकेत काही महत्त्वाची कामं करायची असतील तर पुढच्या 3 दिवसात ती करून घेणं आवश्यक आहे. कारण 27 मार्च ते 4 एप्रिलच्या कालावधीत बँका फक्त दोन दिवसांसाठी खुल्या असतील. म्हणून, जर तुमचं बँकेत काही काम बाकी असेल तर या 3 दिवसांत करून घ्या असं सांगण्यात आलं आहे.

मार्चएन्ड जवळ आला आहे, आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता फक्त 6 दिवस बाकी आहेत. त्यामुळे पीपीएफ खात्यात किमान वार्षिक गुंतवणूक, सुकन्या समृद्धि योजनायांसह 31 मार्चपर्यंत केली जाणारी महत्वाची कामे 3 दिवसांत करून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर, नवीन आर्थिक वर्षात अनेक महत्त्वपूर्ण कामे केली जातात, त्यासाठी बँकेत जाणं अनिवार्य आहे. त्यामुळे बँक संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे कमी दिवस असणार आहेत.

देशभरात महिन्याच्या दुसर्‍या आणि शेवटच्या शनिवारी बँका बंद आहेत.  27 तारखेला शेवटचा शनिवार असल्यानं बँका बंद राहतील. 28 तारखेला रविवार आहे, या दिवशी साप्ताहिक सुट्टी आहे. 29 तारखेला धुलीवंदन आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहतील म्हणून बँकांचे आर्थिक व्यवहार लवकरात लवकर करून घ्यावे.

दरम्यान, 27 मार्च महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी बँक बंद असेल.  28 मार्च रविवार असल्यानं बँका बंद असतील. 29 मार्च होळीमुळे बँक बंद असणार आहे. 30 मार्चला इतर शहरांमध्ये बँका खुल्या राहिल्या तरी पाटण्यात बँका बंदच राहतील. 31 मार्च आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोणतेही सार्वजनिक व्यवहार केले जाणार नाही. 1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्यानं बँक खाते बंद करण्याची धावपळ असणार आहे. 2 एप्रिलला गुड फ्रायडेमुळे बँका बंद असतील. 3 एप्रिल रोजी बँक खुल्या असतील, आणि 4 एप्रिलला रविवारी सुट्टीमुळे बँका बंद राहतील.

थोडक्यात बातम्या

खोकला झाला म्हणून डाॅक्टरांकडे गेल्यावर छातीत जे आढळलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

“कुणी ख्रिसमस तर कुणी रमजान साजरा करा, पण दुर्गा पुजेवरही बंधनं येता कामा नये”

“होय ती व्होल्वो गाडी माझीच, पण मी सचिन वाझेंना कधी पाहिलंच नाही, ना कधी भेटलो” – मनिष भतिजा

इंग्लंड विरुद्ध सामन्यात विक्रमी खेळीनंतर वडिलांच्या आठवणीत भावुक झाला कृणाल पांड्या, पाहा व्हिडिओ

पहिल्याच ODI सामन्यात इंग्लंड संघाचा धुव्वा उडवत प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पांड्याची धमाकेदार खेळी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More