बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही गाणं म्हटलं की कलाकार आणि लोककलावंतानी म्हटलं की नाचे”

अहमदनगर | राज्यातील भाजप नेते आणि राष्ट्रवादी यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक बाचाबाची चालू आहे. निलेश लंके आणि ज्योती देवरे प्रकरणानंतर या दोन्ही पक्षातील वाद वाढलेला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी एकमेकांवर टीका केली आहे.

महाराष्ट्राला आपल्या लावणीच्या प्रेमात पाडणाऱ्या सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. यावरून राज्याचं राजकारण सध्या तापलेलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून रूपाली चाकणकर यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे.

आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील आयोजित एका कार्यक्रमात रूपाली चाकणकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एखादं गाणं म्हटलं नृत्य केलं तर ती कला आणि लोककलावंतानी असं केलं तर ते नाचे, असले खालच्या पातळीचे विचार भाजपचे आहेत, अशा शब्दात चाकणकर यांनी अमृत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

महिलांना दुय्यम वागणूक देणं ही भाजपची संस्कृती असल्याची टीका यावेळी चाकणकर यांनी केली आहे. आपलं ते गंधर्व आणि दुसरे ते नाचे ही मानसिकता सोडून द्या असंही चाकणकर म्हणाल्या आहेत. निलेश लंके हे पुढील 25 वर्ष या मतदारसंघातून निवडून येत राहतील, अशा शब्दात त्यांनी निलेश लंके यांच्या विरोधकांना टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठेंना अटक

“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली 113 एकर जमिन मोकळी केली”

प्रियंका गांधी ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता!

महिन्याला फक्त 1000 रूपये जमा करा, काही वर्षांनी मिळतील तब्बल 12 लाख रूपये

काळजी घ्या! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; धक्कादायक माहिती समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More