बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्हाला लाज वाटली पाहिजे खोटे आरोप करताना”, राज कुंद्रा प्रकरणात राखीची उडी

मुंबई | शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज कुंद्रा हा मुख्य सूत्रधार असल्याचा पुरावा मिळाल्यानं त्याला अटक करण्यात आलं आहे. राजच्या अटकेनंतर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच आता राज कुंद्राच्या समर्थनार्थ राखी सावंत समोर आली आहे.

राज कुंद्राला राखी सावंतने पाठिंबा दर्शवला आहे. शिल्पा शेट्टीनं बाॅलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. कोणीतरी त्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. राज कुंद्रा हे अतिशय चांगले आणि मेहनती व्यक्ती असून त्यांना कोणीतरी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्यांच्यावर खोटे आरोप करताना, असं म्हणत राखीनं राज आणि शिल्पा शेट्टीला समर्थन दिलं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीसोबत बोलताना राखी सावंतनं ही प्रतिक्रिया दिली आहे.

राखी सावंतनं पुढे म्हटलं की, “शिल्पा शेट्टीनं तिला काम मिळवून देण्यास मदत केली आहे. ‘क्रेझी 4’ मधील ‘तुझे टुक देखे’ हे आयटम साँग मुळात शिल्पाला ऑफर करण्यात आलं होतं, पण शिल्पानं राकेश रोशन यांना माझं नाव सुचवलं.”

दरम्यान, राज कुंद्राला न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. आता या प्रकरणी अजून किती रहस्य समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या – 

अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली आपबीती!

पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तासात धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता

“लोकांनी पुढे येऊन राज कुंद्रासारख्या लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे”

द्रविडचा एक मेसेज अन् चाहरनं सामना पालटवला, वाचा नेमकं काय सांगितलं?

“मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचं पूर्ण सामर्थ्य सत्ताधारी शिवसेनेत आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More