बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; भाजप नेत्याच्या ‘त्या’ ट्वीटवर उर्मिला मातोंडकर भडकल्या

मुंबई | बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे  चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गजांनी दिलीप कुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. मात्र, हरियाणामधील भाजपचे आयटी विंगचे प्रमुख अरुण यादव यांनी एक विचित्र ट्वीट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अरुण यादव यांच्या ट्वीटवर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चित्रपट सृष्टीत हिंदू नाव ठेवून पैसे कमवणारे मोहम्मद युसूफ खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीचं न भरून येणारं नुकसान आहे. शोकग्रस्त कुटुंबासाठी तीव्र संवेदना. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्वीट अरुण यादव यांनी केलं आहे.

अरुण यादव यांच्या या ट्वीटवर उर्मिला मातोंडकर चांगल्याच भडकल्या आहेत. अरुण यादव यांचं हे ट्वीट शेअर करत ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, असं सणसणीत उत्तर मातोंडकर यांनी दिलं आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून दिलीप कुमार आजारी होते. दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील.

थोडक्यात बातम्या –

पुण्यातील शाळा सुरू करण्यास मिळाला हिरवा कंदील; दीड वर्षानंतर होणार शाळा सुरू!

रूपाली चाकणकरांच्या ‘बंटी-बबली’च्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

“देशाला बरबाद करणाऱ्यांना केंद्रिय मंत्रिमंडळात ठेवलं आहे”

धक्कादायक! चोरीच्या भितीने लेकरांच्या पायात साखळी बांधून लावलं कुलूप

‘वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून सलाम घेतेस, लाज वाटत नाही का?’, कियारा झाली ट्रोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More