भुवनेश्वर | सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या प्राणी-पक्ष्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. माणसाने प्राणीमात्रांवर दाखवलेली भूतदया तर कधी प्राण्यांनी दाखवलेली हुशारी आणि चातुर्य या व्हिडिओमधून आपल्याला पहायला मिळतं. असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं विषारी कोब्राला चक्क आपल्या हाताने पाणी पाजलं आहे. विशेष म्हणजे पाणी पिणाऱ्या कोब्राने कुठलीही हानी त्या माणसाला केली नाही. 1900 हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि 2 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
हा व्हिडिओ आहे भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा आणि विषारी कोब्राचा. या व्हिडीओमध्ये वन अधिकारी अतिशय प्रेमाने तहानलेल्या सापाला पाणी पाजत आहे. आणि कोब्राही अतिशय समाधानानं आणि निवांतपणे पाणी पितो आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Love & water…
Two best ingredients of life pic.twitter.com/dy3qB40m6N— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 16, 2021
थोडक्यात बातम्या –
गजानन मारणेनंतर आता ‘या’ कुख्यात गुंडावर गुन्हा दाखल
टूल-किट प्रकरणातील संशयितांची न्यायालयात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय!
वाहतूक नियमांचं पालन कसं करावं?; शाळकरी मुलांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल
महिला वर्षभर ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर सांगतात माझ्यावर बलात्कार झाला- अबू आझमी
पुढील दोन दिवसांत ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज