बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! सापाच्या हल्ल्यात मांजराने हवेत घेतलेली झेप पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा व्हिडीओ

मुंबई | साप म्हटलं अनेकांची बोलती बंद होते. समोर साप पाहिला तरी अनेकांना घाम फुटतो. त्यामुळे सापाजवळ थांबण्याचं कोणीही धाडस करत नाही. मात्र एका मांजरानं धाडस केलं आणि त्यानंतर जे घडलं ते  पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडीओ सोशल माध्यामांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की  एका प्लॅस्टिकच्या डब्यात एक साप आहे आणि मांजर त्या सापाजवळ जावून बसतं तेव्हा दोघेही एकमेकांकडे पाहत आहेत. मात्र नेहमीप्रमाणे दंश मारण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मांजर आपल्यातील लवचिकता दाखवत जाग्यावर हवेत उडी घेतं.

मांजर आणि साप दोघे जवळ जवळ असतात त्यामुळे सापाचा मांजरला दंश होणार असं वाटत असताना मांजराने घेतलेली उडी पाहण्याजोगी आहे. मांजराच्या तोंडाजवळून सापाचा दंश होता होता वाचला. उडी घेताना थोडा जरी उशिर झाला असता तर मांजराला दंश झाला असता.

दरम्यान, आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ जितका मजेशीर आहे तेवढ्याच मजेशीर कमेंटही येत आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

पाचवीतील मुलीनं सरन्यायाधीशांना लिहिलं पत्र, म्हणाली….

“आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल”

मोठी बातमी! मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

‘हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर होतं’; नुसरत जहांचे पतीवर गंभीर आरोप

रेल्वे रूळ की नदी?, पहिल्या पावसात मुंबईची झाली तुंबई, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More