बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साप मुंगसाच्या भांडणाचा थरार पाहून तूम्हीही व्हाल थक्क! पाहा व्हिडीओ 

नवी दिल्ली | सोशल मीडियावर कायमच कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होतच असतात. त्यात कधी माणसांच्या चांगुलपणाचे तर कधी त्यांच्यावर ओढवलेल्या नामुष्कीचे गमतीदार दृष्य असतात. तसच कधी कधी प्राण्यांचे, पक्ष्यांचेही वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अशातच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. साप आणि मुंगूस यांची भांडणं तर सगळ्यांनाच माहित आहेत. त्यांच वैर कुणापासून लपलेलं नाही. जेव्हा जेव्हा हे दोघे समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यात रक्तरंजित युद्ध सुरू होतं. असाच त्यांच्या भांडणाचा एक थरारक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साप मुंगूसचे अनेक भयानक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. मात्र, या लढाईची सर्वात गमतीदीर गोष्ट म्हणजे साप किती विषारी असला तरी मुंगूसासमोर त्याचे काही चालत नाही. हेच कारण आहे की, जेव्हा जेव्हा एखादा साप मुंगूसासमोर येतो तेव्हा साप चुपचाप निघून जाण्याच्या प्रयत्नात असतो. अगदी असच या व्हिडीओत साप स्वत: चा बचाव करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, मात्र शिकारी मुंगूस त्याला काही केल्या जाऊ देत नाही. शेवटी, या दोघांच्या भांडणाला खूप रोमांचक वळण लागतं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांकडूनही त्याला खूप पसंती दिली जात आहे.

दरम्यान, साप वारंवार त्याचा हल्ला टाळण्याचा प्रयत्न करतो. पळून जाण्याचाही प्रयत्न करत असतो. मात्र, मुंगूसही त्याच्या मागे पळायला लागतो. कोब्रा पळून गेला आणि मुंगूस त्याचा पाठलाग करत आहे. शेवटी, आपला जीव वाचवण्यासाठी साप एका बिळात जातो, यावेळी मुंगूसही बिळामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला आतमध्ये जाता येत नाही.

 

 

 

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचं औषध समजून प्राशन केलं विषारी औषध अन्…

‘मुंबई इंडियन्सला हरवणं ही सर्वात मोठी गोष्ट’; भारताच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! चिप्सवरुन झालेल्या भांडणात पतीने पत्नीचे तुकडे करुन फेकलं कचऱ्यात

“वाझेंनी एनआयएला असं काय सांगितलं की शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”

व्यायाम करतानाचा मांजराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More