बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिंद्रा जीप चालकाचा ‘हा’ प्रताप वाचून तूम्हीही व्हाल हैराण

ठाणे | मद्यपान करून लोकं वाहनं चालवतात आणि बऱ्याचदा दुर्दैवी अपघात होतात. मात्र, कल्याणच्या एका पठ्ठ्यानं मद्यधूंद अवस्थेत भरचौकात जीप थांबवली आणि झोपी गेला. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच सहजानंद पोलीस चौकीतून महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहचले.

कल्याण-भिवंडी रस्त्यावर एक महिंद्रा जीप चालक मद्यधुंद अवस्थेत हलत-डुलत गाडी चालवत होता. दोन तीन गाड्या अपघात होण्यापासून वाचल्या. मात्र, पादचारी आणि इतर वाहन चालक त्याच्यावर ओरडायला लागले तेव्हा तो काही वेळ थांबला आणि झोप अनावर झाल्यानं गाडी भर रस्त्यातच उभी करुन तो झोपून गेला.

जीप चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळं तो गाडी कुठून कुठे घेऊन जात होता याचीही त्याला शुद्ध नव्हती. गाडी रस्त्यात उभी करून तो सरळ झोपी गेला. त्यावेळी काही नागरिकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. जवळच असलेल्या सहजानंद पोलीस चौकीतून महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहचले आणि या चालकाला ताब्यात घेतलं.

दरम्यान, राजेश राठोड असं या चालकाचं नाव आहे. सामान सोडून झाल्यानंतर त्यानं दारू पिली आणि त्यानंतर तो कल्याणहून भिवंडीकडे जायला निघाला होता. पोलिसांनी चालकाच्या विरोधात कारवाई केली आहे. मात्र, गाडी वेळेत थांबवल्याने मोठा अपघात टळला. नाहीतर मद्यधुंद चालकाच्या हाताने अपघात निश्चित होता.

थोडक्यात बातम्या

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू; लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

पंतप्रधानांनी बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची तडकाफडकी बैठक; कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता

मास्कच्या कारवाईसाठी गाडी थांबवली, तरुणाच्या कृतीनं पोलीसच पळू लागला, पाहा व्हिडीओ

अवघ्या 12 वर्षांच्या बहिणीसोबत सख्या भावाने केलं ‘हे’ दुष्कृत्य; बहीण-भावाच्या नात्याला काळीमा!

मद्यप्राशन केलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा; हटकणाऱ्या पोलिसांची धरली काॅलर, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More