बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंगावर काटा आणणारा अपघात! गाडीची धडक झाल्यावर तरूण उडाला हवेत…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | वाहन चालवताना नेहमी कमी गतीने चालवावं अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता असते. मात्र काही तरूण गाडी खूप वेगाने चालवतात आणि कट मारतात. मात्र त्यांची रायडिंग कधीतरी जीवावर बेतू शकते. अशाच प्रकारे कर्नाटकातील मंगळुरूत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला आहे.

दुचाकीस्वार जोरात गाडी चालवत होता आणि रस्त्यात अचानक एक स्कूटर चालक येऊन थांबला. मात्र त्याच्या अशा मध्येच थांबण्याने मोठा अपघात झाला. स्कूटर चालकावला वाचवण्याच्या नादात दुचाकीस्वाराचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तो एका  क्राँकिटच्या दगडाला धडकला. त्याचा वेग इतका होता की जेव्हा त्याची गाडी धडकली त्यावेळी तो दुचाकीचालक हवेत उडाला आणि त्याची गाडीही, दुचाकीस्वार उडून खूप लांब पडला. त्याची गाडी मागील बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या गाडीवर, त्यामुळे तो दुचाकीस्वारही पडला.

क्राँकिटच्या दगडावर आदळलेल्या दुचाकीस्वाराचं नाव प्रशांत असल्याची माहिती समजत आहे. त्याचं वय फक्त 30 वर्ष इतकं आहे. अपघातानंतर स्थानिकांनी त्याला रूग्णलयात नेलं. महत्त्वाचं म्हणजे ज्या स्कूटर चालकामुळे हा अपघात झाला त्याने तिथून पळ काढला.

दरम्यान, या अपघाताचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यातून एक दिसून येतं की आपण गाडी ही कमी गतीने चालवायला हवी, कारण त्या दुचाकीस्वाराची ती चूक त्याला महागात पडली. तो जर कमी गतीने असता तर त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं नसतं.

 

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

कोरोनामुळं अभिनेत्याचा मृत्यू, मृत्यूपूर्वी लिहिलेली धक्कादायक पोस्ट व्हायरल

बीडमधे पडला असला पाऊस, पाण्याचा लोंढा पाहून अचंबित व्हाल

कोवॅक्सिन ही 12 वर्षांवरील मुलांना देण्यास मान्यता मिळाल्याच्या व्हायरल मेसेज मागचं सत्य वाचा

‘उगाच कुणाच्या घरी जाऊ नका, त्यांच्याशी….’; गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More