बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजोबांचे व्हायोलिन स्किल्स पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. कधी हास्यास्पद व्हिडीओ तर कधी कोणालाही रडवेल असा व्हिडीओ व्हायरल होतो. अनेकदा तर काहींच्या स्टंट्सचा व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसत असतो. अशाकत एका वृद्ध अर्थातच एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील आजोबांची व्हायोलिन वाडवण्याची कला पाहून कोणीही चकीत होईल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती अत्यंत सुंदर पद्धतीनं व्हायोलिन वाजवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी या व्यक्तीचे फॅनच झाले आहेत. या आर्टिस्टचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं असा दावा केला आहे, की हा व्यक्ती कोलकातामधील आहे.

हा व्यक्ती लॉकडाऊनमध्ये व्हायोलिन वाजवून लोकांचं मनोरंजन करतो.व्हिडिओमध्ये दिसतं, की एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला व्हायोलिनवर अजीब दास्तां है ये आणि दीवाना हुआ बादलसारखी गाणी वाजवत आहे. तो हे इतक्या सुंदर पद्धतीनं वाजवत आहे, की व्हिडिओ पाहून लोकंही थक्क झाले आहेत आणि कमेंट करून ते या वृद्ध आजोबांचं कौतुक करत आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ ट्विटरवर आरीफ शहा नावाच्या एका युजरनं शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, की या वृद्ध व्यक्तीचं टॅलेंट पाहा. हा व्हिडिओ अनेकांना लाईक आणि शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

20 फुटाच्या चेंबरमध्ये पडल्यानंतर तरुण 25 सेकंदात दुसऱ्या चेंबरमधून बाहेर, पाहा व्हिडीओ

मोदी-ठाकरे भेट! पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत ‘या’ 12 मुद्यांवर चर्चा

मुंबईसह राज्यात ‘या’ दिवशी अतिवृष्टीचा इशारा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला ‘हे’ आदेश

महात्मा गांधींच्या पणतीला न्यायालयानं ‘या’ गुन्ह्यांतर्गत सुनावली 7 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More