मुंबई | सध्या सोशल माध्यामांवर काय व्हायरल हाईल हे काही सांगता येत नाही. अशाच प्रकारे एका लहान मुलीचा जुना व्हायरल झाला असून त्या चिमुकलीने केलेला हट्ट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. ऐरवी लहान मुलं काही खाण्याच्या गोष्टी मागण्यासाठी हट्ट करतात तर काही गाडीवर चक्कर मारण्यासाठी बालहट्ट करतात.
व्हिडीओमधील मुलगी माझा नवरा कुठे आहे, मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय, असा बालहट्ट आपल्या आईकडे करताना दिसत आहे. लहान मुलगी जमिनीवर निराश होऊन बसलेली असते तेव्हा तिची आई तिला काय झालं विचारते. यावर लहान मुलगी मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय असं बोलते तेव्हा तिची आई तिला बोलते की कोण आहे तुझा नवरा?
आईच्या या प्रश्नावर ती लहान मुलगी मामा माझा नवरा असल्याचं सागंते. मात्र मामा तर मामीचा नवरा आहे, असं आई तिला सांगते. मात्र या सगळ्यामध्ये मुलगी निरागसपणे आपला हट्ट करताना दिसत आहे.
दरम्यान, मुलीचा हा क्युटनेस आणि गोड चेहरा पाहून नेटकऱ्यांनासुद्धा आपलं हसु आवरलं नसावं. हा व्हिडीओ जुना असून तो सध्या व्हायरल झाला आहे.
ये बच्चे भी ना… कौन समझाए इनको…@ipsvijrk @ipskabra @Chhattisgarh_36 pic.twitter.com/ssrMxR81rY
— Vijay kumar (@vkvkmarwat) February 11, 2021
थोडक्यात बातम्या-
…तर आज काश्मिरी तरुण IAS आणि IPS अधिकारी असते- अमित शहा
“शिवजयंती धूमधडाक्यातच झाली पाहिजे, कुठलं सरकार आम्हाला थांबवू शकत नाही”
“पूजा चव्हाणला न्याय देण्याची तुमच्यात धमक नाही”
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
आरजे राघव… पोराच्या एका व्हिडीओनं आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय!