बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमचं आमचं स्वप्न पुर्ण करायचंय, 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल”

बीड | काल बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी जयंत पाटलांनी गेवराईची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेससाठी खूप महत्वाची असल्याचंही सांगितलं.

गेवराई येथे विधानसभा मतदार संघाचा आढावा घेताना गेवराईची जागा राष्ट्रवादीसाठी महत्वाची आहे आणि ती राष्ट्रवादी काॅंग्रेस शंभर टक्के निवडून येईल, असा विश्वास जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केला.

गेवराई येथे सगळे शंभर टक्के युथ अध्यक्ष उपस्थित आहेत. परिवार संवाद यात्रेत गेवराई हा एकमेव मतदार संघ आहे जिथे इतकं चांगलं नियोजन केलं जातं. येथील युथ अध्यक्षांच्या नियमित बैठका झाल्या आहेत. त्यांना नियमित कार्यक्रम दिले तर 2024 साली गेवराई मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वासही पाटलांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यात जरी सरकार आपलं असलं तरी केंद्रात मात्र आपलं सरकार नाहीये. त्यामुळे त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरात महागाई वाढलीय. आपण त्यांच्या विरोधातच असल्याचं समजा आणि केंद्र सरकारच्या विरोधात संघर्षाची भूमिका घ्या, आंदोलन करा, असं आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केलेलं पहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या – 

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! गुलाब चक्रीवादळामुळे ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

“मी खूप नशिबवान, कोरोनामुळे माझा जीव वाचला”

…तर मग कर्णधारची गरजच काय?; KKRच्या ‘त्या’ कृतीवर गौतम गंभीर भडकला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, म्हणाले…

“शेतकऱ्यांना थोडा फायदा मिळू लागला की भाजपच्या पोटात दुखतं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More