बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तू मला या जगातच का आणलंस?’; अभ्यासाला बस म्हणताच चिमुकला आईवर भडकला

मुंबई | सोशल मीडियावर(social Media) कुठला व्हिडीओ कधी व्हायरल(viral video) होईल हे सांगता येत नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकजण इंस्टाग्राम(Instagram),यूट्यूब (youtube)वर आपले व्हिडीओ टाकत असतात. गेल्या आठवड्यात एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यात ती बाबा बाहेर जेवायला नेत नाहीत, असं म्हणत होती. तो व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला होता. आता एका चिमुकल्याचा व्हिडीओही असाच व्हायरल होत आहे.

लहान मुलांचं वय हे हसण्याचं खेळण्याचं असतं. त्यांना अभ्यास नको वाटत असतो. या व्हिडीओतही एक चिमुकला हातात वही आणि पेन्सिल घेऊन बसला आहे. त्याला अभ्यास करायचा कंटाळा आल्याने तो त्याच्या आईशी गप्पा मारतो. त्याने ज्या गप्पा मारल्या त्या अतिशय निरागस असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतंय.

तो चिमुकला अभ्यास करताना आईला म्हणतो, आई मी अस्वस्थ होत आहे. तू मला या जगात का आणलंस?, मला या जगातून निघून जावं वाटतय असं म्हणताच ताे वहीवर पेन्सिल वाजवतो. मग आई विचारते तू का जाणार आहेस?, यावर तो चिमुकला म्हणतो, मला हे जग आवडत नाही. नंतर त्याची आई विचारते, तुला या जगातून का जायचं आहे?, मग तो म्हणतो कारण तू घाणेरडी आहेस. या संपूर्ण व्हिडीओत चिमुकल्याची धमाल पाहायला मिळते. ही धमाल नेटकऱ्यांना चांगलीच आवडली आहे.

हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी दैविक शर्मा 28 यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला 2,76,000 हून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी जन्माला आलात म्हणून काय तुम्ही राजा झालात का?”

एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरमुळे नवरा विकी कौशलवर भडकली कतरिना कैफ!

रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर नवा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

मुलाखतीनंतर उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर!

मोठी बातमी! दीपाली सय्यद दिल्लीत अमित शहांची भेट घेणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More