राहुल-अथियाची संपत्ती वाचून तुम्हीही थक्क व्हाल

मुंबई| गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटर के एल राहुल(KL Rahul) आणि बाॅलिवूड(Bollywood अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty) हे एकमेकांना डेट करत होते. अखेर सोमवारी ते लग्नगाठ बांधणार असल्यानं सध्या त्यांची सगळीकडं जोरदार चर्चा होतेय.

राहुल-अथियाच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर दोघांकडंही कोट्यावधींची संपत्ती आहे. दोघांचंही वार्षिक उत्पन्न कोटीत आहे. दोघाकडंही महागड्या कार आहेत.

अथियानं आतापर्यंत फक्त चार चित्रपट केले आहेत. ते चित्रपटही फारसे कमाल दाखवू शकले नाहीत. परंतु अथियाचा वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून इनकम चालू आहे. ती एका ब्रॅंडकडून चाळीस ते पन्नास लाख रूपये घेते.

अथियाकडं जॅग्वार एक्सएफ आणि मर्सिडीज बेंझ एस-क्साल या महागड्या कार आहेत. तिच्याकडं असलेल्या जॅग्वारची किंमत 55.67 रूपये आहे तर मर्सिडीजची किंमत 2. 17 कोटी रूपये आहे.

अथिया एका वर्षाला दहा कोटी रूपये कमवते. अथियाची एकूण संपत्ती 29 कोटी रूपये आहे. तर के एल राहुल वर्षाला 30 कोटी रूपये कमवतो.

महत्वाच्या बातम्या-