चिंचवडच्या उमेदवारांच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप(Lakhman Jagtap) यांचं निधन झाल्यानं या जागी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. यासाठी येत्या 26 तारखेला मतदान होणार आहे.

भाजपकडून आश्विनी जगताप(Ashwini Jagtap) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादीकडून नाना काटे(Nana Kate) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे(Rahul Kalate) यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

आता या तिनंही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत जोडलेल्या शपथ पत्रातून या उमेदवारांची संपत्ती समोर आली आहे. हे तिनही उमेदवार कोट्यधीश आहेत.

आश्विनी जगताप या 23 कोटींच्या मालकीण आहेत. यामध्ये 2 किलो सोन्याचा समावेश आहे. नाना काटे यांच्याकडं 19 कोटींची संपत्ती आहे, यामध्ये 35 तोळे सोन्याचा समावेश आहे. राहुल कलाटे हे 35 कोटींचे मालक आहेत.

दरम्यान, राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा महाविकास आघाडीला फटका बसू शकतो, अशा चर्चा आहेत. त्यामुळं आता जनतेचा कौल कोणाच्या बाजूनं आहे, हे पाहण्यासाठी आता निकालापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-