बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खोकला झाला म्हणून डाॅक्टरांकडे गेल्यावर छातीत जे आढळलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

नवी दिल्ली | एका 27 वर्षाच्या महिलेला गेल्या अनेक महिन्यांपासून सतत खोकला होता. अनेक उपचार घेऊन देखील महिलेचा खोकला थांबला नाही. त्यानंतर महिलेने डाॅक्टरांकडे तपासणी केली. डाॅक्टरांनी काही अँटिबायोटिक्स दिल्या. मात्र त्याने सुद्धा तिला काही फरक पडला नाही.

सततच्या खोकल्याला टिबी कारणीभूत असेल असं समजून डाॅक्टरांनी तिला टिबीच्या गोळ्या दिल्या आणि टेस्ट करण्यास सांगितली. महिलेचे टिबीचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्यामुळे डाॅक्टरांनी तिच्या छातीचा एक्स-रे काढला. एक्स-रे मध्ये महिलेच्या छातीला सूज असल्याचं आढळून आलं. एवढचं नाही तर महिलेच्या छातीत छोट्या बॅगसारखं काहीतरी असल्याचं देखील डाॅक्टरांना दिसून आलं.

एक्स-रे नंतर डाॅक्टरांनी महिलेच्या छातीतील छोटी बॅग बाहेर काढली तर डाॅक्टरांना देखील धक्का बसला. ही बॅग दुसरं काही नसून कंडोम होता. महिलेच्या छातीत कंडोम गेल्यामुळे महिलेला सतत खोकला आणि ताप येत होता. एवढचं नाही तर छातीतला कंडोम बाहेर काढल्यानंतर सुद्धा महिलेच्या छातीत कंडोमचे बारीक तुकडे राहीले आहेत.

दरम्यान, हा संपुर्ण प्रकार झाल्यानंतर डाॅक्टरांनी पती आणि पत्नीची विचारपूस केली. तसेच हे जोडपं दोघे ओरल सेक्स करताना महिलेने नकळत कंडोम गिळला असेल नाहीतर कंडोम गिळला हे माहित असून सांगायला लाजत असेल, असं डाॅक्टरांनी म्हटलं आहे. महिलेच्या छातीतील उर्वरित कंडोमचे छोटे तुकडे आता ब्रोन्कोस्कोपीच्या मार्फत काढण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“कुणी ख्रिसमस तर कुणी रमजान साजरा करा, पण दुर्गा पुजेवरही बंधनं येता कामा नये”

“होय ती व्होल्वो गाडी माझीच, पण मी सचिन वाझेंना कधी पाहिलंच नाही, ना कधी भेटलो” – मनिष भतिजा

इंग्लंड विरुद्ध सामन्यात विक्रमी खेळीनंतर वडिलांच्या आठवणीत भावुक झाला कृणाल पांड्या, पाहा व्हिडिओ

पहिल्याच ODI सामन्यात इंग्लंड संघाचा धुव्वा उडवत प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पांड्याची धमाकेदार खेळी

“चित्रा वाघ आणि नवनीत राणांवर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं” – तृप्ती देसाई

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More