बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चीनने तयार केली जगातील सुपरफास्ट ट्रेन; प्रतितासाचा वेग पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

बीजिंग | चीन गेल्या वीस वर्षांपासून कमी प्रमाणात, मर्यादित स्वरुपात या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.चीनमधील किंगदाओमध्ये या ट्रेनची निर्मिती झाली आहे. इलेक्ट्रो-मॅगनिक फोर्स म्हणजेच विद्युत चुंबकीय बलाचा वापर करून ही ट्रेन धावते.

चीनने तब्बल 600 किमी प्रतितास वेगाने धावणारी मॅग्लेव ट्रेन सुरू केली आहे. ही जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन असल्याचं बोललं जात आहे. शांघाईमध्ये एक कमी अंतराचा मॅग्लेव मार्ग आहे. चीनमध्ये आतापर्यंत इंटरसिटी मॅग्लेव मार्ग नाही. शांघाई, चेंगदूसह काही शहरांमध्ये या मॅग्लेव मार्गाबाबत पाहणी सुरू करण्यात आली आहे.

बीजिंगपासून शांघाईपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त अडीच तास लागतात. या दोन्ही शहरातील अंतर 1000 किमी आहे. विमानाने प्रवास केल्यास हे अंतर कापण्यास तीन तास लागतात आणि हाय स्पीड ट्रेनने प्रवास केल्यास साडे पाच तास लागतात.

दरम्यान,  ही ट्रेन 1500 किमीच्या परिघामध्ये प्रवास करण्यासाठी उत्तम उपाय आहे. पारंपारिक गाड्यांप्रमाणेच मॅग्लेव्ह रेल्वेची चाके रेल ट्रॅकच्या संपर्कात येत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

भारतात टिकटॉक पुन्हा दाखल होणार, ‘या’ नव्या नावासह परतण्याची शक्यता

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात जानेवारीनंतर सर्वात कमी रूग्णांची नोंद

‘संजय राऊतांनी ‘हे’ काम बंद करावं’; देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना सल्ला

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

राज कुंद्राच्या समर्थनार्थ उतरली गहना; एकता कपूरचं नाव घेत म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More